बंद

    महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना

    • तारीख : 09/08/2023 -
    1. गुजर समाजातील महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
    2. सदर योजना ही ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.
    3. महिला बचत गटांना बँकांमार्फत वितरीत केलेल्या रु.5.00 लक्ष ते रु.10.00 लक्षपर्यंतच्या कर्ज रकमेवरील 12% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळाकडून संबंधित बचत गटांना अदा करण्यात येते.
    4. पात्र महिला बचत गटातील फक्त इतर मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना व्याज परतावा योजनेचा लाभ महामंडळाकडून देण्यात येईल.
    5. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र (सीएमआरसी) मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटात किमान 50% गुजर समाजातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.
    6. प्रथम टप्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात रु.10.00 लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करुन घेण्यास पात्र होईल.
    7. महिला बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील गुजर समाजाची व महाराष्ट्राची रहिवाशी असावी.
    8. पात्र महिलांचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे राहील.
    9. महामंडळामार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याजाचा परतावा बँकेच्या मंजूरीनुसार 5 वर्षापर्यंतच्या कालावधीकरीता बँक प्रमाणिकरणानुसार अदा करण्यात येईल.
    10. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) च्या सहाय्याने राबविण्यात येईल.
    11. लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावास महामंडळामार्फत पात्रता प्रमाणपत्र (एलओआय) निर्गमित करण्यात येते.
    12. बचत गटास महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (एलओआय) प्राप्त झाल्यानंतरच बचत गटाने बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करुन घ्यावे.

    msobcfdc.in

    लाभार्थी:

    --

    फायदे:

    --

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.