शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
- राज्य, देशांतर्गत व आंतराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले गुजर समाजातील विद्यार्थी /विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे.
- शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठीच बँकेकडून मंजूर कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून विद्यार्थ्यांना आधारलिंक बँक खात्यात अदा करण्यात येईल.
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
- गुजर समाजातील विद्यार्थी / विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष महत्तम कर्ज मर्यादेत वितरीत केलेल्या रकमेवरील कमाल 12% व्याज परतावा महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.
- विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्ष असावे व तो इतर मागास प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेयरच्या मर्यादेत असावी.
- विद्यार्थ्यांने महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (एलओआय) प्राप्त झाल्यानंतरच बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करुन घ्यावे लागेल.
- अभ्यासक्रम:
- आरोग्य विज्ञान
- अभियांत्रिकी
- व्यावसायिक व व्यवस्थापन
- कृषी, अन्न प्रक्रिया व पशुविज्ञान अभ्यासक्रम.
राज्यांतर्गत अभ्यासक्रम:
- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (एनएएसी मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
- देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील.
- क्यूएस (क्वाक्वेरेली सायमंड्स) च्या रँकिंग / गुणवत्ता, पात्रता परीक्षा ग्रॅज्युएट रेकॉर्ड परीक्षा (जीआरई), परदेशी भाषा म्हणून इंग्रजीची चाचणी (टोफेल) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील.
- शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये सक्षम प्राधिकरणाने / शासनाने बदल किंवा नवीन अभ्यासक्रम समाविष्ट केल्यास त्यानुषंगाने बदल करण्याचे अधिकार महामंडळाच्या संचालक मंडळास असतील.
देशांतर्गत अभ्यासक्रम:
परदेशी अभ्यासक्रमासाठी:
लाभार्थी:
--
फायदे:
--
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.