प्रस्तावना
गुजर (गुजर / गुर्जर, रेवा गुजर / रेवे गुजर, लेवा गुजर / लेवे गुजर, सोमवंशी गुजर, दोडे गुजर, बडगुजर) समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांचेकडून केली जाणारी मागणी विचारात घेवून शासनाने सदर समाजाच्या सर्वांगिण विकास व आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत, उपकंपनी म्हणून “सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळाची” दि.04.03.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापना करण्यात आली आहे. गुजर समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा (बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना) लाभ देण्यात येईल.