- राज्यातील गुजर समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे.
- गुजर समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसुली करणे.
- गुजर समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
- गुजर समाजासाठी कृषी उत्पादने, वस्तु, साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
- राज्यातील गुजर समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे, त्यांना चालना देणे व योजनांसाठी अहवाल तयार करणे.
- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजुरी दिलेल्या सर्व योजना राबविणे.